छत्रपती शहाजी राजेंच्या वास्तव्याने ऐतीहासिक झालेले गाव

रविवार, १ मे, २०११

कुरुंदा

कुरुंदा सोडताना , मनी उठले काहूर
आला भरून हा उर , ओली झाली ही नजर

कुरुंदा सोडताना , आली पावसाची सर
आला आठवनींचा पुर , धुंद झाले तरूवर

कुरुंदा सोडताना , वनी नाचतात मोर
रूणझुनती पाखरं , आले जुळून हे सूर

कुरुंदा सोडताना , वर ढगांची मखर
इंद्रधनू कडेवर , लाजे चंद्राची ही कोर

कुरुंदा सोडताना , दिसे झाडांना बहर
गोड जांभळं नी बोरं , लोंबे आब्याला मोहर

कुरुंदा सोडताना , शेता फुलांचे आगर
झेंडू मोगरा तगर , जसे उडवी अत्तर

कुरुंदा सोडताना , नदीच्या या काठावर
डोई कोणाच्या घागर , कोण वाजवी पैंजार

कुरुंदा सोडताना , लागे डोळयाला धार
होई आवाज कातर , ह्रदयी येई गहीवर

- श्रीविष्णूराजे पाटील-कुरुंदकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: